जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान

मार्च 6, 2022 6:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे मंगळवार दि. ८ मार्च रोजी दुपरी ३:०० वाजता माध्यम क्षेत्रातील विविध विभागात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

media jpg webp

जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. प्रमुख उपस्थिती जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांची असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादिका शांताताई वाणी आहेत. उपस्थितीतीचे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now