⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात २० जागांसाठी भरती, वाचा डिटेल्स

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात २० जागांसाठी भरती, वाचा डिटेल्स

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) पदांच्या २० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : २०

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

१. जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम

पात्रता काय?

उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अथवा समतुल्य परिक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्र विषयासह कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मात्र मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान ३५% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, .वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलबध्द झाले नाही तर सदर मंडळाची कोणत्याही शाखेतील तसेच कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक (१०+२) परिक्षा कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशा साठी विचार करण्यात येईल.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [जन्म १ ऑक्टोबर २००४ नंतरचा व १ ऑक्टोबर १९८६ पुर्वीचा नसावा]

परीक्षा शुल्क  : ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – २५०/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.