जळगाव जिल्हा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी विनोद पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । रिधुर येथील मुळ रहिवासी तथा मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे हल्ली मुक्काम असलेले राष्ट्रवादी कार्यकर्ता विनोद दामु पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या हस्ते विनोद पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यात तसेच तालुक्यातील प्रत्येक गावागावांत व शहरात जावुनत्यांचे विचार त्यांचे विचार घराघरात पोहचवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.