जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर बसेस सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेनेसुरू होतील असे महामंडळातर्फे सांगण्यात आले होते. मात्र कोरोना पूर्वी जिल्हाभरात दररोज पाच हजारांवर फेर्या होत होत्या आता कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला असूनही केवळ चार हजार फेऱ्या होत आहेत. संप सुटला असता नाही. अद्यापही जळगाव जिल्ह्यातील एक हजार फेऱ्या बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
गेल्या काही वर्षात खासगी प्रवासी वाहने मोठ्या संख्येने वाढली असली तरी शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक एसटी महामंडळाची बस मधून प्रवास करायला पसंती देतात. महामंडळाच्या बस मधून प्रवास करतात. जिल्ह्यातील प्रत्येका गावा गावात महामंडळाच्या बसेस जातात मात्र अजून या बसेस गेल्या नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
जिल्हाभरात बससेवा सुरु झाली असताना आसोदा, भादली मार्गावर अद्यापही बसेसेवा सुरु करण्यात आली नाही. आठ गावांची वाहतूक असलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने या मार्गावरील बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या मार्गावरील ग्रामस्थांनी सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना दिला आहे.
आसोदा, भादली या मार्गावर तब्बल सव्वा दोन वर्षापासून बससेवा बंद आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर व कर्मचारी संप मिटल्यानंतरही अद्याप पर्यंत बससेवा सुरु झाली नाही. लग्नसराई, शैक्षणिक क्लासेस सुरु असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून खाजगी वाहनाचे दुपटीने भाडे द्यावे लागत आहे. गावातील पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन दिवसात बससेवा सुरु न झाल्यास विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात ठिय्या अांदोलन करण्याचे पत्र ग्रामस्थांनी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी, शरद नारखेडे, खेमचंद महाजन, उमेश बाविस्कर, जितेंद्र भोळे. संजय पाटील, संजय ढाके, मिलींद चौधरी उपस्थित होते.