जळगाव शहर
अल्पसंख्याक सेवा संघाच्या वतीने दिव्यांग बांधवांना काठ्या वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । अल्पसंख्याक सेवा संघाच्या वतीने दिनांक २१ एप्रिल रोजी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शाहू नगर जळगाव येथे अंध बांधवांना अल्युमिनियम फोल्डींगच्या काठ्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी अल्पसंख्याक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए खान, उपाध्यक्ष याकुब दाऊद खान, तन्वीर शेख, अल्पसंख्याक सेवा संघाचे अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मुंताजिम खान, मुश्ताक रझा इत्यादी उपस्थित होते. यावेळी मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले होते.