---Advertisement---
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार आदिवासी कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार आदिवासी खावटी अनुदान योजनेतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अभियानाचा शुभारंभ चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते खडकी बु येथे करण्यात आले.

chalisagaon 3

या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार अनूसुचीत जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असून दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.

---Advertisement---

वाटप करण्यात येत असलेल्या खावटी किट मध्ये मटकी, चवळी,  हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर,  शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती अशा स्वरूपाचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आलेले आहे.

सदर आदिवासी कुटुंबाना देण्यात येणाऱ्या वस्तू चांगल्या दर्जाच्या आहेत की नाही याबाबत तसेच वाटपात गैरप्रकार न होता पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. तसेच आगामी काळात आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी यंत्रणा व मदत उभी करेल असे आश्वासन देखील आमदार चव्हाण यांनी दिले.

याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, भाजपा तालुका संघटन सरचिटणीस तथा खडकी बु चे उपसरपंच धनंजय मांडोळे, सरपंच सचिन पवार, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, गुलाब दादा, गजेंद्र विसपुते, रणजित पाटील, अमोल घोडे, सहा.प्रकल्प अधिकारी बछे साहेब, प्रा.वर्षाताई निकम, मुख्याध्यापक गवारे सर, सरदार मॅडम, रावते मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी वीर योद्धे भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे  प्रास्तविकात आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी खावटी योजना संदर्भात सविस्तर माहिती विशद करून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना याबाबत माहिती दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---