---Advertisement---
गुन्हे राष्ट्रीय

निवडणुकांमध्ये पैसा वाटणं ठरवण्यात येणार गुन्हा; ‘ही’ आहेत विधेयक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सभागृहात तीन विधेयकं मांडली. जुन्या ब्रिटिशकाली कायद्यात बदल आणि राजद्रोहाचं कलम वगळण्यासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ही विधेयकं स्टँडिंग कमिटीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आलेली आहेत.

Untitled design 36 jpg webp webp

आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स अॅक्ट या तीन कायद्यातील बदलांसंदर्भात विधेयक आणण्यात आलेलं आहे. या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकं मांडली आहेत.

---Advertisement---

कायद्यामधील ब्रिटिशकाली तरतुदी वगळण्यासंदर्भात मागील चार वर्षांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर आज अमित शाह यांनी यासंबंधीचं विधेयक मांडलं. यामध्ये १२४ अ हे राजद्रोहाचं कलम नव्या तरतुदींमध्ये वगळ्यात आलेलं आहे. तर नवीन भादंवीमध्ये सेक्शन १५० महत्त्वाचं ठरणार आहे. नवीन विधेयकामध्ये विघटनवादी शक्तींना रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

यासह लहान मुलांच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरदूत वाढवण्यात आलेली आहे. यात पूर्ण माफी मिळणार नसून शिक्षा कमी होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांमध्ये पैसा वाटणं गुन्हा ठरवण्यात येणार आहे.

विधेयकामध्ये पैसा वाटण्याच्या गुन्ह्यामध्ये एक वर्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. कायदा हा शिक्षा देण्यासाठी नसावा तर न्याय देण्यासाठी असावा, असं लोकसभेत बोलतांना अमित शाह यांनी सांगितलं. पुढे हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आलेलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---