जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जिल्हा परिषद कन्या शाळेतील व चमकवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थिनींना पुणे येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या गुणवंत सोनवणे यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. या दोन्ही शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले.
या लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्राताई पाटील, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे सोमनाथ माळी, सरपंच वैशाली पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, कजगाव येथील कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय महाजन, उपाध्यक्ष अमृता पाटील, सदस्य नासिर खाटीक, आधार साठे, प्रवीण महाजन, केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक सोनवणे, मुख्याध्यापिका रंजना भांडारकर या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या वेळी पालक उपस्थित होते. कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला पालकांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.