भुसावळात आमदारांच्या निधीतून १५ संगणक व प्रिंटरांचे वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून लोहमार्ग पोलिस ठाणे, प्रांत कार्यालय व ग्रामीण रुग्णालयात 15 संगणकांचे वाटप करण्यात आले. प्रशासनातील कामाला गती यावी हेतूने लोकांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी आमदार सावकारे यांनी संगणकांचे वितरण केले.
प्रशासनाच्या कामात येणार गतिमानता
प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे सहा संगणक, सहा प्रिंटर देण्यात आले तसेच ग्रामीण रग्णालय, ट्रामा केअर सेंटरला पाच संगणक व दोन प्रिंटर देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी व कर्मचारी उपस्थित होते. येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यास चार संगणक व दोन प्रिंटर आमदार सावकारे यांनी दिले. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक विजय घेरडे व कर्मचारी उपस्थित होते. 15 संगणक व 10 प्रिंटर यावेळी आमदारांच्या हस्ते देण्यात आले.