⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | गुन्हे | राष्ट्रीय लोक अदालतीत 19 प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय लोक अदालतीत 19 प्रकरणांचा निपटारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । यावल शहरातील न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी तसेच दाखल पूर्व 19 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात 32 लाख 75 हजारांची रक्कम तडजोडीपोटी वसूल करण्यात आली. या राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालय आवारातच विविध राष्ट्रीय कृत बँका, विविध वित्तिय संस्थांचे व्यवस्थापक व कर्ज वसुली विभागाचे प्रतिनिधी तडजोडीसाठी उपस्थित होते.

32 लाख 75 हजारांची रक्कम तडजोडीपोटी वसुल
यावल न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे, अ‍ॅड.उमेश बडगुजर या दोन सदस्यीय पॅनल सह साक्षीदार म्हणून समांतर विधी सहायक शशीकांत वारूळकर, अजय बडे यांच्या समोर फौजदारी व दिवाणी एकूण 190 तर दाखल पुर्व (प्रिलिगेशन) एक हजार 649 असे एकूण एक हजार 839 प्रकरणे ठेवण्यात आली. फौजदारी व दिवाणी नऊ प्रकरणांमध्ये निपटारा करण्यात आला व नऊ लाख 79 हजार 436 रुपयांची रक्कम तडजोडीपोटी वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे दाखल पूर्व 10 प्रकरणात निपटारा करण्यात आला असून त्यात 22 लाख 96 हजार 138 रुपयांची रक्कम तडजोडीपोटी वसूल करण्यात आली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एक हजार 794 प्रकरणापैकी 19 प्रकरणात निपटारा करीत एकूण 32 लाख 75 हजार 574 रुपये तडजोड शुल्कापोटी वसुल करण्यात आले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
राष्ट्रीय लोक आदालतीसाठी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एस.बी.शुक्ल, लघू लेखक एस.एम.तेली, वरीष्ठ लिपिक सी.एम.झोपे, कनिष्ठ लिपिक एस.पी.जी.एस.लाड, एस.जे.ठाकुर, एच.जी.सूर्यवंशी, डी.ए.गावंडे, पी.डी.चव्हाण, एस.एस.वाघ, ए.पी.सावदेकर, ए.बी.बागुल, एम.डी.जोशी, आर.एस.रायपुरे आदींनी परीश्रम घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह