⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | कृषी सहसंचालक लाथार्थ्याच्या भेटीसाठी थेट शेतशिवारात

कृषी सहसंचालक लाथार्थ्याच्या भेटीसाठी थेट शेतशिवारात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । पाचारो येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध लाभार्थ्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. यानिमित्ताने कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लाभार्थी शेतकऱ्यांशी शेतशिवारात जाऊन थेट संवाद साधला.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे अनुदानावर पुरवठार करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाडिबीटी प्रणालीव्दारे अनुदान दिले जाते. शासन आपल्या दारी कार्यक्रमात भडगांव व पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील चेतन रवींद्र ठाकरे यांना रूपये ८ लाख अनुदानाचे स्वयंचलित कम्बाईंड हॉर्वेस्टर यंत्राची चावी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रमेश वाघ या लाभार्थ्यास दुध उत्पादक सुगरण डेअरीसाठी १० लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पचायतराज, पर्यटन मंत्री गिरिष महाजन, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव आदी उपस्थित होते.

कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे लाभार्थी सुनील संतोष पाटील यांच्या दोन हेक्टर क्षेत्रावरील मोसंबी लागवड व एक हेक्टर कापूर क्षेत्रावरील ठिंबक सिंचनाची प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी केली. नवल संतोष पाटील यांच्या दीड हेक्टरवरील पेरू लागवड क्षेत्राची पाहणी केली. नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत कैलास विश्वनाथ पाटील यांचे ट्रक्टर, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत नांगर-रोटाव्हेटरची पाहणी करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील कुटुंबीयांची भेट घेतली मोजें-नांद्रा येथील गिरणाई प्लास्टिक कंपनीस भेट देवून पहाणी व चर्चा केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.