जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरटयांनी धमाकूळ घातला असून अशातच बोदवड बसस्थानकात मुक्कामी उभ्या असलेल्या चार बसेसच्या डिझेल टँकमधून मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल 620 लीटर डिझेल चोरीस गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या डिझेलची किंमत 28 हजार रुपये आहे.

बसचालक किरण सीताराम सोनवणे (विदगाव, ता.जळगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस (एम.एच.06 एस.8613) ही बसस्थानकात लावल्यानंतर त्यांच्यासह अन्य चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी गेले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता बसेसमधून डिझेल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बस (क्रमांक एम.एच.06 एस.8613) मधून 165 लीटर, बस (क्रमांक एम.एच.20 बीएल 0945) मधून 160 लीटर, बस (क्रमांक एम.एच.40 एन.9097) मधून 145 लीटर, आणि बस (क्रमांक एम.एच.40 एन.9702) मधून 150 लीटर डिझेल लांबवले.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर डेपो मॅनेजर निलेश कलाल आणि स्थानकप्रमुख अनिल बाविस्कर यांनी घटनास्थळी पाहणी केली. डिझेल चोरीमुळे बसेस दिवसभर स्थानकात उभ्या राहिल्याने एस.टी.च्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. चालक वर्ग बस लावण्यासाठी धास्तावले आहेत.