⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शेतीच्या वादातून वाघरेत दोन गटांमध्ये धुमचक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । शेतीच्या वादातून पारोळा तालुक्यातील वाघरे येथे दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आलीय. या हाणामारीत तब्बल १२ जण जखमी झाले आहेत. या प्रकणारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वाघरे येथे दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. यात १९ रोजी रात्री आठच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. तर यात जखमी झालेल्यांवर दुसर्‍या दिवशी म्हणजे २० जून रोजी हल्ला करण्यात आला. यात मल्हारी विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नाना भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू पाटील, गजेंद्र नाना पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्यातील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, प्रवीण पाटील, महेश पाटील, बापू पारधी, किशोर भोई, यांनी रूग्णालयात धाव घेतली. या बाबत कृष्णा भिकारी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज मल्हारी पाटील, अनिल मल्हारी पाटील, सुदाम रमेश पाटील, सुनील पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, रमेश विक्रम पाटील, मल्हारी विक्रम पाटील व रावसाहेब मगन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.