
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवासेंदिवस वाढत असून यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतं आहे. अशातच एसटी बस आणि मिनी बसमध्ये भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आज सकाळी बुलढाण्यामध्ये भीषण बस अपघाताची घटना घडली होती. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत