⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

खान्देशातील प्रवाशांना दिलासा! धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस धावणार, असे आहे वेळापत्रक?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । खान्देशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच रेल्वे‎ प्रशासनाने धुळे-दादर विशेष रेल्वे‎ गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आठवड्यातून तीन‎ दिवस धावणार आहे. त्यामुळे धुळे,‎ चाळीसगाव, नांदगाव भागातील‎ प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी व‎ मुंबईहून परत येण्यासाठी हक्काची‎ रेल्वे गाडी मिळणार आहे.

जळगावला IMD कडून अलर्ट जारी

०१०६५ क्रमांकांची डाऊन‎ दादर-धुळे एक्सप्रेस ही दादरहून‎ रविवार, सोमवार आणि शुक्रवार‎ सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल.‎ धुळे स्थानकावर रात्री ११.३५‎ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक‎ ०१०६६ अप धुळे-दादर एक्सप्रेस ही‎ गाडी धुळे येथून सोमवार,‎ मंगळवार व शनिवारी सकाळी‎ ६.३० वाजता सुटेल, तर दादर येथे‎ दुपारी १.१५ वाजता पोहोचेल.‎

या स्टेशनावर असेल थांबा?
ही गाडी शिरुड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, या स्टेशनावर थांबेल. त्यामुळे व्यापारी, नागरीकांना‎ मुंबईत व्यापारानिमीत्त तसेच‎ मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी‎ सोईची ठरणार आहे. ही एक्सप्रेस‎ आठवडयातून तीन दिवस धावणार‎ असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद‎ मिळाल्यास ती दैनंदिन सुरू होऊ‎ शकते.

भुसावळमार्गे धावणार उधना-मालदा टाउन विशेष रेल्वे

मुंबईकडे जाण्यासाठी‎ चाळीसगाव स्थानकात अनेक‎ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या‎ थांबत असल्या, तरी या रेल्वे‎ गाड्या अगोदरच फुल्ल होवून‎ येतात. त्यामुळे चाळीसगाव‎ स्थानकावर प्रवाशांना कसरत‎ करावी लागते. यामुळे धुळ्याहून‎ सुरू होणाऱ्या या नव्या‎ एक्सप्रेसमुळे प्रवास आरामदायी‎ होणार आहे.‎