---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

प्रलंबित हप्त्यांच्या निषेधार्थ लाभार्थ्यांचे ढोल बजाओ आंदोलन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । विशाल तांगडे । बोदवड येथील नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हप्त्यांच्या निषेधार्थ नईम खानसह लाभार्थ्यांचे नगरपंचायत समोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

magnya

योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले घराचे काम पूर्ण केले आहे. व काही लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन काम पूर्ण केले अश्या परिस्थितीत काम पूर्ण करूनही योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते टाकलेले नाही. त्याचा निषेधार्थ बोदवड नगरपंचायतीच्या समोर ढोल बजाओ आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांनी व राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक मुजमिल शाह, लतीफ शेख, हकीम बागवान यांनी मध्यस्ती करत लाभार्थ्यांच्या अडचणीवर लक्ष देऊन लवकरात लवकर लाभार्थ्यांर्थ्याच्या खात्यात हप्ते वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यावे अशी मागणी केले.

---Advertisement---

यावेळी नईम खान बागवान, ऐनूर ठेकेदार, महमूद, राजू टेलर, लखन माळी, ठेकेदार, लुकमान पिंजारी, समशेर ड्रायव्हर यांच्यासह अन्य लाभार्थी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---