रावेरला ग्रामरोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

ऑक्टोबर 3, 2022 7:00 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर येथील तहसिल कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवक संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये एक दिवसीय लक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रोजगार सेवक यांना फिक्स मानधन देण्यात यावे, दि. 2 / 5 / 2011 च्या अर्धवेळ शासननिर्णय रदद् करून तो पुर्णवेळ करण्यात यावा, अश्या विविध मागण्या करण्यात आल्या.

jalgaon 2022 10 03T185843.166 jpg webp

तसेच रोजगार सेवकांचे मानधन हे त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावे, रोजगार सेवकांना पदावरून काढण्याचा अधिकार ग्रामसभेला न देता तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावा, मंजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी स्मॉट फोन व नेट पॅक रिचार्ज देण्यात यावा व ग्राम रोजगार सेवकांना विमा संरक्षण देण्यात यावे, वयोवृद्ध ग्राम रोजगार सेवकांच्या वारसांना रोजगार सेवक म्हणुन नियुक्त करावा , रोजगार सेवकांना नियुक्ती ठिकाणच्या ग्रा.पं मध्ये रोहयोचे काम सुलभ होण्यासाठी टेबल , खुर्ची देण्यात यावी , तसेच शासन निर्णय 2013 नुसार रोजगार सेवकांना प्रवास भत्ता व अल्पोहार भत्ता ( TADE) लागु करावा.

Advertisements

दरम्यान, वरील सर्व मागण्या 2008 पासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत असून वेळोवेळी शासनस्तरावर लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करून ही दुर्लक्ष कराण्यात येत आहे, असा आरोप ग्राम रोजगार सेवक संघटनेने केला आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now