जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव येथे भाजपच्या वतीने कृषी संस्कृती व श्रम संस्कृतीचा जागर तसेच बळीराजाचे स्मरण करण्यासाठी “बळीराजा गौरव दिवस” साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शेतकरी बंधूंच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले.पूजनानंतर परीसरातील शेतकरी बांधवांचा रुमाल,टोपी,नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंदन पाटील यांनी बळीराजा विषयी भावना व्यक्त केल्या त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, शिरिषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,अँड वसंतराव भोलाने, पुनीलाल अप्पा महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील,नगरसेवक पप्पु भावे,भानुदास विसावे,शरद अण्णा धनगर, ललित येवले, विजय महाजन, विलास महाजन, गुलाब मराठे,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शिवसेनेचे संजय चौधरी,भैय्या महाजन, बुटा पाटील, वाल्मिक पाटील,पवन महाजन,भाजपचे भास्कर मराठे, प्रल्हाद पाटील, डोंगर चौधरी, आबा पाटील, आनंदा धनगर, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन,आंनद वाजपेयी,किरण वऱ्हाडे, हर्षल चव्हाण, रवी पाटील, विकास चव्हाण, विक्की महाजन यांच्यासह भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले तर आभार गोपाल पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंदनभाऊ पाटील, गुलाबराव मराठे, गोपाळ पाटील यांनी प्रयत्न केले.