---Advertisement---
चोपडा

धानोऱ्याला गुलालाची उधळण; पारंपरिक वाद्यांनी वेधले लक्ष

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवी विसर्जन मिरवणुक काढण्यात येते. यावर्षी सुद्धा गुलालाची मोठी उधळण करत
पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाई थिरकत मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ओम मित्र मंडळ फुलं उधळून जल्लोष करत मिरवणूक शांततेत पार पाडत दुर्गा देवीला निरोप देण्यात आला.

jalgaon 2022 10 07T120923.102

तालुक्यातील धानोरा येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने देवी मातेची पुजा अर्चा करून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी दोन वाजता देवी विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. संपूर्ण गावातून पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या पारंपरिक मार्गाने काढत मिरवणुकीत गुलाल व फुलांची उधळण करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.

---Advertisement---


सदगुरु मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, स्वस्तिक मित्र मंडळ, महर्षी वाल्मिकी मंडळ, गढीपुरा मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ इंदिरा नगर, रॉयल्स ग्रुप,संत सावता माळी मंडळ, कालिंका ग्रुप मंडळ यांनी सहभाग नोंदवला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात रात्री दहा वाजता मिरवणूक आटोपली. यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि संतोष चव्हाण, पोउनि चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवला. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहकार्य केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---