⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

तुमच्या आमदार, खासदारांना सब स्टेशन बनवायला सांगा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील विज वितरणच्या कारभाराने पुन्हा भोंगळ कारभाराचा कळस काढला आहे. ऐन कापूस उगवण्याच्या वेळेस बंद असलेल्या कुंड्यापाणी फीडरची दुरूसी करून विजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती करणाऱ्या शेतकरींना येथे प्रभारी असलेल्या कनिष्ट अभियंता सुरजंडोधरे यानी शेतकरींना तुमचे आमदार, खासदार काय करताहेत त्यांना आधी धानोरा सब स्टेशनकरायला सांगा. त्यांच्याकडून होत नाही. आताच आम्ही काही करू शकत नाही दुसऱ्या दिवशी काय ते पाहू.असा उपदेश करत रात्रभर किरकोळ बिघाडासाठी विजपुरवठा बंद ठेवला व तब्बल ५० तास हे बिडर बंद उगवलेली कापसाची रोपे करपत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती कापसाची लागवड झाली आहे.जेमतेम आठ तास मिळणारी विज व त्यातच अती तापमान, यात पिक उगवण करणे खूप जिकरीचे ठरत आहे.त्यातच महावितरणचे धानोरा कार्यालयाकडून भर घातली जात आहे.येथून विजपुरवठा होणाऱ्या कुंड्यापाणी या फिडरला चार दिवस रात्री विज मिळते.

मंगळवारी सकाळी ६ वा.बंद झालेली विज बुधवारी रात्री ८ वा.वेळेनुसार येणार होती.मात्र काही किरकोळ बिघाड झाल्याने धानोरा विज वितरणने या भागातील तब्बल २५ ते ३० डिप्याच बंद करून टाकल्या.यामुळे अनेक शेतकरींनी धानोरा येथे धाव घेतली.तेथे ऑपरेट व्यतिरिक्त कोणीही आढळून आले नाही.तेव्हा शेतकरींनी येथील प्रभारी कनिष्ट अभियंता सुरज मंडोधरे यांना फोन लावून बंद असलेला विजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली असता, तो सुरळीत करणे तर दुरच मात्र त्यांनी तुमचे आमदार, खासदार काय करताहेत.

आम्हाला फोन करता मग त्यांना आधी धानोरा सबटेशन करायला भाग पाडा ना.आम्ही आता रात्रीच काहीही करणार नाही.असे उपदेशाचे डोस पाजले.त्यावर संतप्त शेतकरींनी रात्रभर आम्ही येथेच मुक्काम करतो अशी भुमीका घेतली.असता अभियंता मंडोधरे यांनी तुम्हाला करायचे ते करा अशी भुमीका शेतकरींची थट्टा केली.

तब्बल ५० तास कुंड्यापाणी फिडरचा अर्धा भागाला विजपुरठा खंडीत ठेवला.त्यामुळे विहरीत पाणी असूनही ते पिकाल देता येत नसल्याने जेमतेम उगवलेली कापसाची रोपे करपत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत येथील भोंगळ कारभारावर नियंत्रण आणून कीमान शेतीला तरी सुरळीत विजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.