---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

..तोपर्यंत यांना आम्ही झोपू देणार नाही ; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । जालन्यात भाजपच्या वतीने जलआक्रोशात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या मोर्चावेळी वरुणराजाने हजेरी लावली. यावरुन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शाब्दिक टीका केली. “सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे चाललंय सगळं. आम्ही पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही. पण ईश्वराने पाणी दिलं”, असं फडणवीस म्हणाले.

fadanvis

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर ठाकरे सरकार गंभीर नाही. मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला, पहिल्यांदा सांगितलं की ही योजना रद्द केली नाही, नंतर एकही रुपयाचा निधी दिला नाही. पण मी आज या मोर्चाचा निमित्ताने सांगू इच्छितो, जोपर्यंत सरकार जनतेला पाणी देत नाही, तोपर्यंत यांना आम्ही झोपू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला.

---Advertisement---

जालन्यात आज भाजपने ‘जलआक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं होतं. जालन्याचे हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, संतोष पाटील दानवे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला. मराठवाडा पाणी प्रश्नावरून भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे. औरंगाबादनंतर आज जालन्यात भाजपने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं.

‘मुख्यमंत्र्यांनी नाही पण देवाने पाणी दिलं’

जलआक्रोशात मोर्चावेळी वरुणराजाने हजेरी लावली. यावरुन फडणवीसांनी शाब्दिक कोटी केली. “सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे चाललंय सगळं. आम्ही पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही. पण ईश्वराने पाणी दिलं”, असं फडणवीस म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---