महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेसच्या महासचिवपदी देशमुख व बढे

जुलै 21, 2022 3:33 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी यावल तालुक्यातील नायगाव येथील प्रसन्न गुणवंतराव देशमुख व कोरपवाली येथील अजय रामकृष्ण बढे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

yawal 25 jpg webp

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील शिंदे यांनी नियुक्ती केली. तर आमदार भाई जगताप साहेब, सीताराम चव्हाण यांचे माध्यमातून करण्यात आली. यासाठी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष अजाबराव पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद गट नेता प्रभाकर सोनावणे, गणेश बारसे, पंचायत समिती गट नेते शेखर सोपान पाटील, नितीन व्यंकट चौधरी, अमोल भिरुड, कदिर खान व राजू करांडे यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now