---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे महाराष्ट्र

पोलिस उपअधीक्षक ठरले देवदूत ! कसे वाचा सविस्तर ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे हे एका परिवारासाठी देवदूत ठरले आहेत. पाचोरा – जळगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात त्यांनी एका कुटुंबाचे प्राण वाचवले आहेत.( dhanajay yerule pachora news )

Deputy Superintendent of Police jpg webp webp

पाचोरा- जळगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. शासकीय वाहनातून तातडीने रुग्णालयात पोहोचवून तिघांना वेळेवर उपचार उपलब्ध करून दिले.

---Advertisement---

जळगाव ते पाचोरा राष्ट्रीय महामार्गावरील नांद्रा- हडसन दरम्यानच्या रस्त्यावर दुसखेडा (ता. पाचोरा) येथील दिनेश वाके, आशा वाके व त्यांचा लहान मुलगा दुचाकीसमोर नीलगाय आली. ते अपघातग्रस्त झाले आणी ते रस्त्यावर पडले.

याचवेळी उपअधीक्षक धनंजय येरूळे हे आपल्या शासकीय वाहनाने पाचोऱ्याकडे येत होते. त्यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्तांची विचारपूस केली. आपल्या शासकीय गाडीचे चालक पंकज मोरे व पोलिस कर्मचारी अजयसिंग राजपूत यांच्या मदतीने दिनेश वाके, आशा वाके व त्यांच्या लहान मुलास आपल्या शासकीय वाहनात टाकले. पाचोरा येथील पोलिस कर्मचारी राहुल बेहरे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन लगबगीने घटनास्थळी बोलावले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---