⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरातील दोघा गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई ; एसपींनी काढले आदेश

जळगाव शहरातील दोघा गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई ; एसपींनी काढले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तींच्या विरूद्ध ‘एमपीडीए’ सह हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे. अशातच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील दोघां गुन्हेगारांना जळगाव जिल्हा हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा अधीक्षक राजकुमार यांनी काढले आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पोलिसात एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी संदीप गावित यांनी केले होते.

दोन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून जळगाव शहरात जिल्हयांत ठिकठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालीला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता सुव्यवस्था ठेवण्याबाबत त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. आता दोघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हा हद्दपार केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.