ओळखपरेड : भुसावळच्या जबरी चाेऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या ३२ संशयितांची तीन तास चौकशी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिसांच्या परिसरात जबरी चोरी, शस्त्र अधिनियमाखालील ज्यांच्याकडे गावठी पिस्तूल आणि हत्यारे सापडली आहेत. अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची येथील शहर पोलिसात शनिवारी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० अशी ओळख परेड घेण्यात आली. त्यात शहर हद्दीतील ११ व बाजारपेठच्या हद्दीतील २१ अशा एकूण ३२ संशयितांना पाचारण केले हाेते.
मागील वर्षी पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरटे, गावठी पिस्तूल बाळगणारे अशा संशयितांची यादी तयार केली होती. त्यातून शनिवारी जबरी चोरी करणारे व शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड झाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचाैरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठेचे निरीक्षक राहूल गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय प्रकाश वानखेडे यांनी संशयितांची सविस्तर चौकशी करून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले. त्यात संशयित सध्या कुठे राहतो, काय काम करतो? कोणते वाहन वापरतो? त्याचे मित्र कोण? वापरता मोबाइल कोणता? ही माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांच्याकडून शहरातील अन्य सक्रिय गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी याेजना
शहरातील गुन्हेगारी, जबरी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या दृष्टीने ही ओळख परेड झाली. यातील संशयितांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली. आवश्यकता असलेल्यांवर चाप्टर केसेस करण्याच्या सूचना डीवायएसपी वाघचौरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हे देखील वाचा :
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात