⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

राहूल गांधींचे सभासदत्व रद्द करून लोकशाहीचा गळा घोटला

जळगाव लाईव्ह न्यूज | १ एप्रिल २०२३ जळगांव ग्रामीण तालुका कॉंग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जळगांव ग्रामीण कॉंग्रेस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी राहुल गांधी यांच्या सांसदिय समितीने रद्द केलेला खासदारकी कशी बेकायदेशीर (न्यायालयाच्या परिघात राहून) व मुस्कटदाबी सुरु आहे याची सविस्तर मांडणी केली.

या प्रसंगी संदिप घोरपडे राहूल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशभरातील समाजमन ढवळून काढले व देशपातळीवर जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत. म्हणून प्रमुख प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘वेगवेगळे ‘स्टंट’ करून देशातील जनतेची दिशाभूल सुरू आहे.

संसदेत ७ फेब्रुवारी रोजी अदानी समुहाच्या घोटाळ्याशी संबंधीत चौकशीची मागणी / अदानी-मोदी संबंध काय ? ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेशात अदनीचा मोदींसोबतचा प्रवास व टेंडर अदानीला मिळावे असा पंतप्रधानांचा दबाव याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू द्यायचे नाही असे ठरवून त्यांच्या जुन्या वक्तव्याचा विपर्यास करून ‘न्यायव्यवस्थेचा’ गुजरात पॅटर्न वापरून राहूलजींचे सभासदत्व रद्द करून तसेच काँग्रेस अध्यक्ष खरगे व राहुलजींचे वक्तव्य लोकसभेच्या अधिवेशन काळातील कामकाजातून वगळून लोकशाहीचा गळा घोटला असेही ते म्हणाले.