⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.

जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या भडगाव तालुक्यात  पिंपरखेड, गिरड, गुढे, कजगाव, असे एकूण 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.  या प्राथमिक आरोग्य केंद्रासह या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत एकूण 23 उपकेंद्र आहेत या उपकेंद्रात किमान आठवड्यातून दोन दिवस ठराविक देऊन त्या दिवशी कोरोना संसर्गजन्य आजाराची लस दयावी. या उपकेंद्र कार्यक्षेञात बहूतांश वयोवृध्द पुरूष व महिलांचे प्रमाण असून तसेच शुगर बी.पी.या आजाराचे पुरूष मंडळी आहेत तरी चार ही आरोग्य केंद्राअंर्तगत लसीकरण सुरू करावे व लसीचा तुटवडा भासणार नाही. यांचे योग्य नियोजन करून त्या त्या उपकेंद्रात पर्यायी व्यवस्था म्हणून लसीकरण सुरू करावे.

 काही या उपकेंद्र अंतर्गत गावातील ग्रामस्थांची ही मागणी आहे की, त्या त्या उपकेंद्रात लसीकरण व्हावे तसेच ग्रामस्थ लसीकरणासाठी लांब अंतर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी टाळा टाळ होत असून उपकेंद्रामध्ये लसीकरणासाठी आरोग्य विभागाने तात्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन लसीकरणाला सुरूवात करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे व युवती जिल्हा कार्याध्यक्ष कोमल पाटील उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.