⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शासकीय जागेवर अतीक्रमण केल्याप्रकरणी २ सदस्यांना अपात्र करण्याची मागणी..!

शासकीय जागेवर अतीक्रमण केल्याप्रकरणी २ सदस्यांना अपात्र करण्याची मागणी..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । तालुक्यातील फरकांडे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र मन्साराम पाटील व कविता संजय पाटील यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतीक्रमण करून बांधकाम करून एकञ कुटुंबासह सदर जागेचा वापर करीत असल्यामुळे त्यांना अपाञ घोषित करण्यात यावे अशी मागणी फरकांडे येथील रहीवासी छगन शामराव बेहेरे व माजी सरपंच सुरेश बळीराम पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परीषद,जळगाव) यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. 

दरम्यान.एरंडोल पंचायत समितीचे विस्तार अधीकारी हे याप्रकरणी विनाकारण दिरंगाई करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निपक्षपातीपणे अहवाल सादर करण्याचे आदेश एरंडोल पंचायत समितीस व्हावेत अशी तक्रार करण्यात आली आहे. 


रविंद्र मन्साराम पाटील यांनी गट नंबर २३ भोगवटा करणार्याचे नाव सरकार या सरकारी मिळकतीवर २०बाय ६० एवढ्या जागेवर पक्के घराचे बांधकाम केलेले आहे तसेच पाटील यांनी गट नं. २२ या गावठाणासाठी राखीव असलेल्या सरकारी जागेवर बेकायदेशिर अतीक्रमण करून सुमारे १००बाय १५० चौरस फूट जागेवर गुरांसाठी गोठा व चारा ठेवण्यासाठी पञी शेडचे बांधकाम केलेले आहे. पाटील हे एकञ कुटुंबासह अतीक्रमण केलेल्या जागेचा वापर  आजसुध्दा करीत आहेत असे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आलेले आहे.


कविता संजय पाटील यांचे सासरे कै. विनायक हिरामण पाटील यांच्या नावे असलेल्या ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक ८/२ (४९४चौरसफूट) या जागेवर  राहत्या घराचे बांधकाम केलेले आहे. सदरील बांधकाम हे मालकी हक्कापेक्षा वाढीव सरकारी जागेवर ८बाय१५ चौरसफूट एवढ्या जागेवर अतीक्रमण करून घराचे बांधकाम केलेले आहे.तसेच कविता पाटील यांचे पती संजय विनायक पाटील यांनी गट नंबर २२ गावठाणासाठी राखीव असलेल्या सरकारी जागेवर बेकायदेशिर अतीक्रमण करून १००बाय१०० चौरस फूट जागेवर  गुरांसाठी गोठा,चारा व शेतमाल ठेवण्यासाठी पञी शेडचे बांधकाम केलेले आहे अशी तक्रार आहे.


अहवालाच्या विलंबाचे कारण पंचनामा न करता भेट देणे, अर्जदारापेक्षा सामनेवाल्याचे ऐकणे या बाबींचा जाब विचारण्यात यावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. 
या अर्जावर १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तक्रारदार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह