⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | हज्जन कुलसुमबी उर्दू हायस्कूल शाळेची पडताळणी करण्याची मागणी

हज्जन कुलसुमबी उर्दू हायस्कूल शाळेची पडताळणी करण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील भालोद येथील हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेबाबत संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन राज्याचे विद्यमान गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांना येथील अलअमीन संस्थेच्या संचालकांनी दिले.

निवेदनात नमूद आहे की, भालोद येथील हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेचे सन २००६ ते २०१८, या कालावधीमधील संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करण्यात यावी असे म्हटले आहे, लक्षणीय बाब म्हणजे संस्था स्थापनेपासून अलअमीन या संस्थेने हज्जन कुलसुमबी नावाची शाळा आजपर्यंत सुरुच केली नसल्याने शाळे विरोधात आतापर्यंत सर्वशिक्षण विभागापासून मंत्रालयापर्यंत तब्बल ११० निवेदने रवाना झाली आहेत. दरम्यान, शाळेच्या सर्वमान्यतेबाबत कागदपत्रांची साशंकता असल्याने शाळा बंद करावी असे यावलचे तत्कालीन गट शि.अ. यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून मार्गदर्शन मागितल्याने शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच २०१२-१३ ते २०१७-१८ पर्यंत शाळेबाबतचे कोणतेही रेकॉर्ड दिसून आलेले नाही, असे जि.प.जळगावच्या तत्कालीन उप.शि.अ,(माध्य) के.डी. चव्हाण यांनी तर शाळा भेटीच्या वेळी २००९ते २०१२या कालावधी मधील कोणतेही शालेय रेकॉर्ड जनरल रजिस्टर आढळून आले नाही असे जि.प.जळगावचे विद्यमान उप.शि.आ (माध्य) देवांग यांनी नमूद केले आहे. राज्यात सुरु असलेल्या बोगस टिईटी प्रमाणपत्र चौकशी व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ आयडी अर्थात बोगस वैयक्तिक मान्यतेची चौकशी प्रमाणे सदर हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेच्या वरील वर्षातील शाळेबाबतच्या संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करुन शाळेबाबतच्या रेकॉर्डची सत्यता झाल्यास अलामिन या संस्थेच्या संस्थापक सदस्यावर कारवाई करावी सत्यता पडताळणी न झाल्यास हज्जन कुलसुमबी उर्दू हायस्कूल शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून शाळेवर कडक कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह