⁠ 
बुधवार, डिसेंबर 4, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | चोरीचे प्रकार वाढल्याने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

चोरीचे प्रकार वाढल्याने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात चोरीचे प्रकार वाढले असून यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन जलील पटेल, रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांनी केली आहे. सदर भेटीत लवकरात लवकर चौकशीचे आदेश देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांना देण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यात चोऱ्या व घरफोडया रोखण्यासाठी ग्रामसुरक्षादल रात्रीची गस्त म्हणून स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

हे देखील वाचा:

author avatar
टीम जळगाव लाईव्ह