⁠ 
रविवार, मे 19, 2024

शासकीय कामांसाठी लाचेची मागणी, आमदार पाटलांनी केली अधिकार्‍यांची कानउघाडणी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11.30 वाजता महत्वपूर्ण आढावा बैठक झाली. यावेळी शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरीकांकडून तहसील कार्यालयात लाचेची मागणी केली जात असल्याने आमदार पाटील यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

पोट खराब क्षेत्र वहिताखाली आणून नोंद करण्यासाठी शासनाचे परीपत्रक असताना आमदारांनी मागणी केल्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने महसूल विभागाने शिबिरांचे आयोजन केले. मात्र, या कामाला पाहिजे तशी गती मिळाली नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त करीत मतदार संघातील इतर गावांच्या बाबतीत कार्यवाहीत गती आणण्याच्या सूचना केल्या तसेच मतदारसंघातील शेत रस्ते, शिव रस्त्यांबाबत कृती आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. महत्त्वाचे उतारे, ड पत्रक नोंदी, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले व इतर तत्सम दाखले नागरीकांना वेळेवर मिळत नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त करीत कामांसाठी नागरीकांसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदारांनी सांगत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

बैठकीला तहसीलदार श्वेता संचेती, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, बोदवड तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या तीनही तालुक्यातील मंडळाधिकारी, तलाठी , जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.