जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । राज्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच डेल्टा प्लस या नावाच्या विषाणूने हळूहळू हातपाय पसरविणे सुरु केले आहे. दरम्यान, डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्याने राज्यात लॉकडाऊन का? असा सवाल उपस्थित केला जात असताना त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली असून तशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही असं आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते जालन्यात बोलत होते. तसेच डेल्टा प्लस रुग्ण वाढीमुळे घाबरण्याचं काम नाही असंही ते म्हणाले.ते जालन्यात बोलत होते.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंदेखील ते म्हणाले. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं.