12वी पास आहात का? तब्बल 7565 जागांवर नवीन मेगाभरती, पगार 69100 पर्यंत

सप्टेंबर 24, 2025 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

job jpg webp

बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत. या भरतीद्वारे ७,५६५ रिक्त जागा भरल्या जातील. ज्यामध्ये ५,०६९ पुरुष आणि २,४९६ महिलांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकते?

शैक्षणिक पात्रता म्हणून किमान 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 1 जुलै 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आहे, सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींसाठी वयात सूट आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

कशी होणार निवड?

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५ साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, लेखी परीक्षा घेतली जाईल. ही लेखी परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) असेल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल.
वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-३ वेतनश्रेणी ₹२१,७००-₹६९,१०० पगार मिळेल.

अर्ज शुल्क

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now