स्व.निखिल खडसे यांच्या स्मरणार्थ अयोध्या नगर येथे पाणपोईचे लोकार्पण
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ अयोध्या नगर गणपती मंदिर येथे पाणपोईचे उद्घाटन जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अनंत झांबरे यांच्या स्वखर्चाने व प्रयत्नाने अयोध्या नगर या परिसरातील नागरिकांना व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ करून दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस एजाज मलिक, जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, उपमहापौर सुनिल खडके, जिल्हा महानगर सरचिटणीस सुनिल माळी, जळगांव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडेउपस्थित होते.
यासाठी अनंत झांबरे, हेमंत महाजन, वैभव सावदेकर, अविनाश वाणी, गणेश पाटील व राम पांडे यांनी परिश्रम घेतले. तर अनंत झांबरे यांनी स्वखर्चाने पाणपोई चालू केल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने गुलाबराव देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.