जळगाव जिल्हा

केमिस्ट व सामाजीक सेवेसाठीच जीवन समर्पत : सुनील भंगाळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून केमिस्टहित व समाजसेवेसाठी सदैव कार्यरत केमिस्ट भूषण सुनील भंगाळे यांचा वाढदिवस केमिस्ट भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात कोरोनाच्या नियमाचे पालन करत महारक्तदान, रक्ततुला, अमदान क्रिकेट स्पर्धा बक्षिस वितरण, गोसेवा यासह विवीध सामाजीक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला.

सुनील भंगाळे वाढदिवसानिमीत्त आयोजीत कार्यक्रमांचा प्रारंभ हनुमान चालीस पठण सकाळी १९.३० वाजता लेवा भवन येथे झाला. तसेच सकाळी १० वाजता लिलाई मुलांचे अनाथाश्रम, सकाळी ११ वाजता रिमांड होम येथे विद्यर्थ्यांना व दुपारी १२ वाजता मातोश्री आनंदाश्रम वृध्दाश्रम येथे अनदान कार्यक्रम संपन्न झाला. तसेच याचवेळी सकाळी ९ वाजता महारक्तदान कार्यक्रमाचा देखील प्रारंभ केमिस्ट भवनात करण्यात आला. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी व माधवराव गोळवलकर रक्तपेढी या दोघा रक्तपेढया रक्तसंकलनासाठी उपस्थीत होत्या. दुपारी १.३० वाजता १६ फेब्रुवारी रोजी संघटनेतर्फे आयोजीत कैमिस्ट भूषण चषक क्रिकेट स्पर्धेचे उपविजेता अमळनेर संघ व विजेता भंगाळे ११ संघास व इतर वक्षिस वितरण मान्यवर व अतिर्थीच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सत्कारमूर्ती जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचेसह सचिव अनिल झंवर, कोषाध्यक्ष शामकांत वाणी, उपाध्यक्ष कनकमल राका, संदीप बेदमुथा, अविनाश महाजन, रुपेश चौधरी, श्रीकांत पाटील, अनिरुद्ध सरोदे, संजय तिवारी, जीतेंद्र जैन, दिनेश मालू, रमाकांत सोनवणे, संजय नारखेडे, पंकज पाटील, जयेश महाजन, उदय खांदे, खालीद शेख, शैलेश राठोड, ब्रजेश जैन, अमित चांदीवाल, इरफान सालार, स्वप्नील रहे, लखीचंद जैन, सचीन अगवाल, राजेंद्र भोसले, राजाभाऊ काबरा, इश्वर चौधरी, प्रशांत पाटील, पंढरी पाटील, संजय जैन, मुकेश गुजरायी, सुरेश भंडारी, योगेश भोकरे, दिपक पाटील, प्रवीण मिस्त्री, सारंग महाजन, प्रशांत पाटील, कैलास न्याती, गोविंदराव महाजन, तसेच जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व जिल्हयातील केमिस्ट बांधव उपस्थीत होते.

रक्ततुला कार्यक्रम यशस्वी

दुपारी २.३० वाजता रक्ततुला कार्यक्रम करण्यात आला. यात महारक्तदान शिबीरात सुमारे २५४ रक्तपिशवी (बॅग्ज) संकलीत करण्यात आल्या. या संकलीत झालेल्या रक्तपिशवी (बॅग्ज़) ठेवून सुनील यांची रक्ततुला करण्यात आली. रक्तदानात केमिस्ट बांधव, वैद्यकिय प्रतिनीधी, पत्रकार बंधू भगीनी व इतर क्षेत्रातील व्यक्तीनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

Related Articles

Back to top button