⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

खुशखबर.. ! खाद्यतेलाच्या किंमतीत झाली इतकी घसरण, आणखी स्वस्त होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । महिन्याभरापूर्वी गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर पुन्हा कमी होतानाचे दिसून येतेय. जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमती घसरल्या. किरकोळ बाजारात गेल्या महिन्यापूर्वी सोयाबीन तेल पाऊच १६५ ते १७० रुपयापर्यंत होते; ते आता जवळपास १५५ ते १५० रुपयापर्यंत आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

गेल्या काही महिन्यात महागाई प्रचंड वाढली आहे. अन्नाधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत (Vegetables) आणि इंधनापासून (Fuel) ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघतोय. भारतात एकूण वापराच्या ६८ टक्के खाद्यतेल आयात केले जाते. यात युक्रेन, रशिया, मलेशिया, इंडाेनेशिया, अर्जेंटिना देशाचा मोठा वाटा आहे. मात्र, रशिया- युक्रेन युद्धामुळे भारताची सूर्यफूल तेलाची तर इंडाेनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाची आयात बंद झाली होती. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले होते.

मात्र गेल्या महिन्यात इंडाेनेशियाने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय माघे घेतल्याने भारतीय बाजारपेठेतील सर्वच खाद्यतेलाचे दर कमी हाेण्याला सुरूवात झाली आहे. किरकाेळ बाजारात खाद्यतेलाची दर १५ ते २० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 9 टक्क्यांनी घसरण झाली असून, पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक बाजारात खाद्यतेलाचे दर ( प्रती लिटर / रूपये)
सूर्यफूल तेल १९० रु.
सोयाबीन तेल १५५ रु.
पाम तेल १४० रु.