⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | महाराष्ट्र | शेतकऱ्यांसह कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा! आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या..

शेतकऱ्यांसह कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा! आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या..

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता
कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय, आता मिळणार 16 हजार रुपये
कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली.
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
पुणे येथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार
अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहे योजना
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.