⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | कापूस खरेदीत मापात पाप करून शेतकऱ्याची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

कापूस खरेदीत मापात पाप करून शेतकऱ्याची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२३ । आधीच शेतकरी विविध संकटाचा सामना करून उत्पादन घेत असतो. कबाड कष्ट करूनही कधीकधी पिकविलेल्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने खर्चही निघत नाही. त्यातही काही व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. कधी भावात तर कधी वजनात. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे कापूस खरेदी करण्यासाठी आलेल्या धुळे येथील व्यापाऱ्याकडून मापाप पाप करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी व्यापारी व मध्यस्थ व ट्रकचालक अशा तिघांविरूद्ध फसवणूक केल्याचा पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
धुळे जिल्ह्यातील चितोड येथील व्यापारी संशयित अभिजीत रवींद्र साळुंखे याने वडगाव (ता. जामनेर) येथील मध्यस्थी नाना चिंधू कोळी याला वाकडी येथील शेतकरी महेंद्र लोखंडे यांच्याकडे बुधवारी (ता. ११) कापूस खरेदी करण्यासाठी पाठविले होते. महेंद्र लोखंडे यांचा कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे भाव करून मोजण्यासाठी ट्रकसह व्यापाऱ्याची माणसे गावात आली.

महेंद्र लोखंडे यांनी प्रत्येक वेचणी वेळी मोजून भरलेल्या कापसात तब्बल आठ ते दहा क्विंटल कापूस कमी भरत असल्याची शंका आल्याने कापूस मोजताना काट्यावर व तोलावर लक्ष ठेवून मापारी काटा मारत आहे, असे लक्षात आल्यावर रंगेहाथ पकडले व ही बाब गावकऱ्यांना समजल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला.

आपली चूक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच मापारी व हमालांनी पळ काढला. मात्र शेतकऱ्यांनी चालकासह ट्रक ताब्यात घेत फत्तेपूर पोलिसांना बोलावून ताब्यात देण्यात आला. भरण्यात आलेली आयशर गाडी फत्तेपूर येथील तोल काट्यावर १७ क्विंटल ९० कापूस मोजणी केली असता ५ क्विंटल ५० किलोचा फरक आढळून आला.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला गावात बोलावले. मात्र तो न आल्याने व शेतकऱ्यांचा संताप आनावर झाल्याने व्यापारी व मध्यस्थी यांच्यावर रात्री उशिरा आयशर ट्रक (क्रमांक एमएच १८, बीजी २४९२) चालक संशयित सुरेश बुधा मोरे याच्यासह संशयित अभिजित साळुंखे (धुळे) व नाना कोळी याच्याविरुद्ध २ लाख ४९ हजार ६१० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.