जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । चोपडा शहरातील ३९ वर्षीय तरुणाची लग्न लावून देण्याच्या नावाखाली २ लाख ९० हजारात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील दीपक भुरेसिंग बारेला (वय ३९) यांना लग्न करण्याकरिता २ महिलांसह ३ पुरुषांनी दीपक यांची २ लाख ९० हजार रुपयात फसवणूक केली. लग्न लावून देण्यासाठी संशयित आरोपी राधा रामधन परदेशी, रामधन मोहन परदेशी, कविता कृष्ण कडाळी, अमित कातकरी, कैलास अशोक पाटील यांनी नाशिक येथील पंचवटी येथे बनावट कागदपत्र बनवत त्याला सांगतिले की, मुलीचे पहिले लग्न झाले आहे.
मुलीने सांगतिले की, पहील्या नवर्याकडे एक महिना तर तुमच्याकडे १५ दिवस राहील असे सांगून यातील संशयित आरोपीनी वेळोवेळी बँके खात्यावर दीपककडून २ लाख ९० हजार रुपये घेत फसवणूक केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे हे करीत आहेत.