जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । मूळजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा केसीई सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे मानद व्यवस्थापकीय समनव्यक शिवाजी ओंकार उभाळे (वय ६६) यांचे रात्री १:२५ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुजय, स्नुषा माधुरी, मुलगी योगिता, नातू ध्रुव व स्मित असा परिवार आहे. यांच्या दुःखात केसीई परिवाराचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य प्रा.एस.एन.भारंबे, कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे, उपप्राचार्य के.जी. सपकाळे, समनव्यक स्वाती बराटे, उमेश पाटील, प्रसाद देसाई सर्व आजी – माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी.