⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | झुरखेडा येथील आठ वर्षीय काेराेनाबाधित मुलाचा मृत्यू

झुरखेडा येथील आठ वर्षीय काेराेनाबाधित मुलाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात गुरुवारी १६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, २८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदवस वाढ होत असतानाच दुसरीकडे दिवसभरात आठवर्षीय सहव्याधिग्रस्त बालकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी वयाचा मृत्यू आहे.

गुंतागुंतीचा क्षयरोग आणि न्यूमोनियाचा त्रास असल्याने धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील आठवर्षीय बालकाला ३० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने बालकाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच बालकाचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी बालकाचा मृत्यू झाला. गुरुवारच्या शासकीय अहवालात या मृत्यूची मात्र नोंद नाही. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात ९ मृत्यू झाले असून, सर्व रुग्ण हे सहव्याधिग्रस्त होते. कोरोना कमी होत असला तरी व्याधिग्रस्तांना मात्र धोका अजूनही कायम आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह