जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शक्ती पेपर मिलमध्ये अवजड पेपर रोल अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजकुमार अनिल शर्मा ( वय 18 बडहारा दुबे, दुधई, ता.तमकुहिरा, कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. शक्ती पेपर मिलमध्ये राजकुमार शर्मा हा तरुण कामास होता. काम करीत असताना पेपर रीवायंडर रोल त्याच्या अंगावर पडल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. अत्यवस्थ अवस्थेत त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना बुधवार, 6 रोजी दुपारी त्याचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात सीअएमओ यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.