⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

एलएलबी प्रवेशाच्या अर्जांसाठी १२ पर्यंत मुदत

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेनंंतर आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्यात या सीईटी परीक्षा होणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा सीईटी परीक्षा वेळेत होतील, अशी शक्यता आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांसाठीचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये अर्ज प्रक्रिया होऊन मे आणि जून महिन्यात टप्प्याटप्प्याने सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

असे आहे वेळापत्रक
एलएलबी ३ वर्षांसाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ७ व ८ जूनला परीक्षा होतील. एलएलबी ५ वर्षांसाठी ७ पर्यंत अर्ज भरता येईल, १७ व १८ मे रोजी परीक्षा होईल. बीए, बीएड व बीएस्सीसाठी ७ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येईल.