⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पदवी प्रमाणपत्र अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसाव्या पदवीप्रदान समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी,पदविका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहे. त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमान विभागाने केले आहे.

सविस्तर असे की, विद्यापीठातर्फे ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२० आणि एप्रिल, मे २०२१ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशा सर्व विद्यार्थ्यासाठी आणि पीएच.डी. धारशंकरीता पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. पदवी प्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड,डेबीट कार्ड व नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरावे असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. किशोर पवार यांनी केले आहे.