रविवार, डिसेंबर 10, 2023

तारीख ठरली : शरद पवार येणार जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यव्यापी दौर्‍यावर निघाले आहेत.ते नुकतेच सातारा येथे गेले होते. त्या नंतर ते राज्यव्यापी दौरा करत आहेत.ते आता जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सुद्धा येणार आहेत.

दि.१० जुलै रोजी पवार जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव किंवा मुक्ताईनगर येथे सभा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपण राज्यभरात दौरे करून पक्षाशी बेईमानी करणार्‍यांच्या विरोधात हल्लाबोल करणार असल्याचे जाहीर केले होते.

शरद पवार हे जळगाव १० जुलै रोजी दौर्‍यावर येणार आहेत. शरद पवार यांचा दौरा निश्‍चीत असून दौर्‍यात मुक्ताईनगर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.