⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | महाराष्ट्र | तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका; हे आहे कारण

तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका; हे आहे कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | आज सकाळी १०.२० वाजता अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ वाजता पुन्हा एकदा मेजेस आला. एकाचवेळी सर्वांच्या मोबाईलवर एकच मेसेज आल्याने प्रचंड घबराहट उडली. हा कोणता स्कॅम तर नाही ना? आपला मोबाईल हॅक तर झाला नाही ना? मेजेसवर क्लिक केलं तर मोबाईलचा स्फोट तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले. मात्र जर तुमच्याही मोबाईलला असा मेसेज आला असेल तर घाबरुन जावून नका.

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा मेसेज म्हणजे, सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३२ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला होता. विशेषत: ग्रामीण भागात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अजूनही नागरिकांमध्ये त्या मेसेजबद्दल भीतीचे वातरावरण आहे. मात्र आज तुम्हाला आलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.