⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

डांभुर्णी जी. प. शाळेत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत कोणत्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या कृत्याला बळी न पडता जिल्हा परिषद शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्या साठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात डांभुर्णी ग्रामपंचायत उपसरपंच तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी म्हटले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुरूजीत चौधरी यांनी म्हटले आहे की, डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते, त्यावेळेस शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह इतर उपस्थित शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सांगितले की माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच पुरुजित चौधरी यांनी ग्रामपंचायत मार्फत आणि त्यांच्या पत्नी तथा यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत तसेच जिल्हा परिषद सदस्य आर. जी.नाना यांनी जिल्हा परिषद मार्फत आमच्या शाळेसाठी भरीव मदत केली असल्याचे सांगून तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रेमापोटी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आर्थिक देणग्या दिल्या त्याबद्दल कौतुक केले होते आणि आहे, तसेच त्यांनी साहेबांना सांगितले की,पुरूजीत चौधरी हे गेल्या तीन वर्षापासून शाळेत सतत रोज किंवा एक दिवसाआड संपर्कात असतात.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या इच्छेनुसार कुवतीनुसार, परिस्थितीनुसार जिल्हा परिषद शाळेला देणगी दिली परंतु सर्वांची नावे आली पाहिजे म्हणून आणि कोणावरही अन्याय होणार नाही म्हणून आपण सर्वांना घेऊन त्यांचा सत्कार करणार होतो,यात कोणताही राजकीय हेतू नव्हता परंतु गावातील एकाने फक्त राजकारण म्हणून याला वेगळे स्वरूप आणले यात पक्षपातीपणा आणि भेदभावाचे राजकारण सुरू केल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणि देणगी देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परंतु त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास होत असल्याने याचे वर्चस्व काहींना सहन न झाल्याने त्यांनी कुटील षडयंत्र रचून जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्यां विरुद्ध काही जणांना आणि काही ठराविक ब्लॅकमेलर यांच्या मार्फत वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी राजकीय सामाजिक आणि ग्रामस्थांची दिशाभूल करून शाळेची आणि चांगले काम करणाऱ्यांची बदनामी करून राजकीय,सामाजिक,राजकारण सुरू केले आहे.

दि. 23 मार्च रोजी या काही राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेत देणगीदार यांचा सत्कार आयोजित केला आहे,देणगीदारांचा सत्कार आवश्यक आहे परंतु ज्या पद्धतीने राजकीय षड्यंत्र व तसेच गटातटाचे राजकारण करून हा कार्यक्रम राबविला जातोय तो शाळेसाठी व गावासाठी घातक ठरणार आहे.निव्वळ स्वतः न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी शाळेचे व तसेच गावाचे वातावरण गढूळ करून ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहेत. माजी विद्यार्थ्यांनी आप-आपल्या इच्छेनुसार,कुवतीनुसार, परिस्थितीनुसार जिल्हा परिषद शाळेला देणगी दिली,परंतु डांभुर्णी गावातील एकाने फक्त आपल्या मर्जीतील देणगीदारांची नावे मीडिया माध्यमातून प्रसिद्ध करून इतर काही देणगीदारांची नावे जाणून बुजून प्रसिद्ध न करता प्रत्यक्षपणे पक्षपातीपणा आणि भेदभावाचे राजकारण सुरू केल्याने ग्रामस्थांसह शैक्षणिक क्षेत्रात आणि देणगी देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

डांभुर्णी जि.प.शाळा ही प्रगतीपथावर असून हे माझ्यासाठी माझ्या गावासाठी अभिमानास्पद बाब आहे,आणि जो पर्यंत मी आहे तो पर्यंत माझ्या शाळेसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून डांभुर्णी जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट शाळा बनवणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असे सुद्धा डांभुर्णी ग्रामपंचायत उपसरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

हे देखील वाचा: