जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवास क्षेत्र असलेल्या वडोदा वनक्षेत्रालगतच्या शेतीशिवारात वन्यप्राण्यांकडुन शेती पिकाची नासधुस मोठ्या प्रमाणात होत आहे.
वनक्षेत्रातिल बहुतांश ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत पुरेशा पावसाअभावी कोरडेठाक आहे.यामुळे वन्यप्राणी शेती शिवाराची धोकेदायक वाट धरीत आहे.तसेच वनक्षेत्रात हद्दीतील चराई योग्य कुरण मोठ्या प्रमाणावर नष्ट होऊन रानतुळस व तरोटा उगवला असुन पाणी व अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी शेती शिवाराची वाट धरत असल्यामुळे वनक्षेत्रालगत शेती असल्याने परीसरात शेती पिकवा नुकसानीचे प्रमाण वाढत आहे.
वनविभागाकडुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी वनविभागाच्या बेबसाईट वर ऑनलाईन अर्ज सादर करतांना शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने अर्ज सादर करतांना आवश्यक कागदपत्रांची पि डि एफ फाईल अपलोड करावी लागत आहे.अनेकदा दिवसभर साईट जाम असल्याने प्रकरण सादर करण्यास अडचणी निर्माण होत असुन तिनं चार दिवस घालवावे लागत असल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांमध्ये याबाबत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.