जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । वादळी वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील साैर पंपाचे नुकसान झाले आहे. ही घटना पारोळा तालुक्यातील शेवगे येथे साेमवारी दुपारी घडली. परिणामी हंगाम पूर्व कपाशी लागवड सुरू असताना सौर पंपाचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रब येथील शेतकरी गोकुळ शंकर सरदार यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात आला आहे. दरम्यान, शेवगे परिसरात साेमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गाेकुळ सरदार यांच्या शेतातील सौर पंपावरील पॅनल उडून गेले आहेत. यामुळे सरदार यांचे मोठे आर्थिक नुकसान आहे. दरम्यान, हंगाम पूर्व कपाशी लागवड सुरू असताना सौर पंपाचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.