दलाल परिवारातर्फे भारत मातेचे पूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनीपेठेतील दलाल परिवारातर्फे भारत मातेचे पूजन करण्यात आले. देशभक्तीपर गीतांना परिसर दुमदुमला होता.
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनीपेठेत दलाल परिवारातर्फे भारत माता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी दीप प्रज्वलन शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे व माजी माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पूजन माजी नगरसेवक सुनील माळी यांनी तर भारत माता पूजन होमगार्डचे माजी वरिष्ठ अधिकारी आर.सी.दलाल, कल्पना दलाल यांनी केले. भारताचा भव्य नकाशा तयार करून त्यावर पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित आहे. आपला देश हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. देश स्वच्छ आणि हिरवागार ठेवण्याचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून कोरोनाला दूर ठेवावे असेही त्यांनी सांगितले.